देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ
अमरावती जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या निर्मितीचे काम चालू आहे .या मराठी विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड झाली आहे. अनेक भाषांची विद्यापीठ विद्यापीठे भारतात निर्माण झाली आहेत पण मराठी भाषेचे विद्यापीठ अजून नव्हते . आतापर्यंत भारतात तेलुगु तामिळ हिंदी संस्कृत कन्नड इत्यादी भाषेचे विद्यापीठे निर्माण झाली आहेत. डॉक्टर अविनाश आवलगावकर हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील काठी या छोट्याशा गावचे आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.