"Empowering Minds, Unlocking Knowledge"

ख्रिस गेल .. एक जिवंत दंतकथा

0

ख्रिस गेल एक जिवंत दंतकथा

क्रिकेटच्या मैदानावर ख्रिस गेल फुल फॉर्म मध्ये असताना बॅटिंग पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे .२१  सप्टेंबर१९७९  रोजी जमैका येथे जन्मलेल्या या महान फलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या अप्रतिम कौशल्याने संपूर्ण विश्वातील क्रिकेट चाहत्यांचे हृद्य  जिंकले आहे. वाऱ्यासारख्या निघणाऱ्या त्याच्या बॅटमधून धावा आणि चौकार षटकारांचा साठा यामुळे तो कमालीचा विस्फोटक वाटतो.
क्रिस गेलच्या फलंदाजी मध्ये आक्रमकता ,कधी कधी रागीटपणा…. प्रत्येक चेंडूला  एक संधी समजून खेळणारा ख्रिस गेल, विपक्षी टीमला महाभयंकर वाटतो. त्याच्या बॅटमधून सतत जल्लोष असतो उत्सवाचा …….

एखादा शूर योद्धा रणभूमीत उतरावा आणि शत्रू पक्षाची दाणादाण उडून द्यावी त्याचप्रमाणे ओपनिंगला येणारा क्रिस गेल…
क्रिकेटच्या विश्वातील एक महाकाय आकर्षण आपल्या धडाकेबाज फलंदाजीने नेहमी लक्षात राहणारा…
ख्रिस गेल म्हणजे नुसता क्रिकेटर नाही तर एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व सुद्धा आहे .त्याने आपल्या जीवनात आलेल्या अडचणींना सामोरे जाण्याचे साहस केले. वर्ल्ड टी 20 च्या स्पर्धेत त्यांनी केलेले अप्रतिम प्रदर्शन आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये गाजवलेले विक्रम यामुळे तो आबाल वृद्धांमध्ये आदर्श क्रिकेटर बनला. क्रिकेटच्या इतिहासात ख्रिस गेलने आपला अमिट असा ठसा उमटवलेला आहे तो नवीन खेळाडूंना सतत प्रेरित करत आलेला आहे.

 

आयपीएलचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा तो एका नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही ते नाव म्हणजे ख्रिस गेल..
वेस्टइंडीज टीमचा आधारस्तंभ म्हणजे ख्रिस गेल. त्यांनी आयपीएल मध्ये 2009 ते 2021 इतकी वर्ष साम्राज्य केलं त्याने आपला आयपीएलचा प्रवास केकेआर पासून सुरू केला नंतर तो आर सी बी मध्ये सुद्धा खेळला .पंजाब किंग्स इलेव्हन कडून खेळल्यानंतर त्याने आयपीएल सोडलं.

Happy birthday chris gayle.

chris gayle

 

अनेक आश्चर्यकारक विक्रम त्यांच्या नावावर आहेत..
एक दिवसीय क्रिकेट मधील सर्वात मोठा स्कोर
2015 मध्ये इंग्लंड विरुद्ध 215 धावा बनवून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोर त्याने केलेला आहे.
T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला खेळाडू..
2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांनी आपले टी ट्वेंटी मधील पहिले शतक ठोकले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार..टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी……
ख्रिस गेल यांच्या  जन्मदिनी त्यांना  लक्ष लक्ष शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More