"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS exam hall ticket

Nmms

0

NMMS exam Hall ticket

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्य, व उच्च माध्य, शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४

Phone No. – ०२०-२६१२३०६६/६७

Email: mscepune@gmail.com

Website: www.mscepune.in

प्रसिध्दी निवेदन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साटी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७४४ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,४५७ शाळा व एकूण २,४८,३१२ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्याथ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २१.१२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पार्यायानंल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या । अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

(अनुराथा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४.

दिनांक : ७/१२/२०२४

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More