"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS final answer key 2024-25

0

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्य, व उच्च माध्य, शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४

Phone No. – ०२०.२९७०९६१७

Email: mscepune@gmail.com

Website: www.mscepune.in

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४

प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. ०८/०१/२०२५ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

दिनांक :- १४/०१/२०२५

(अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४११००४

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More