NMMS GEOGRAPHY CHAPTER 9 नकाशा प्रमाण
NMMS नकाशाप्रमाण

नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रुपांतरित करावी लागतात. त्यासाठी भूमिती व गणिती पध्दतींचा वापर करावा लागतो.
नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्यासाठी तीन प्रकार आहेत.
1. शब्दप्रमाण 2. अंक वा संख्याप्रमाण
3. रेषा वा रेखाप्रमाण किंवा आलेख प्रमाण
शब्दप्रमाण- यामध्ये अंतरासाठी प्रमाणदर्शक शब्दप्रमाण वापरले जातात. उदा. 1 सेमी = 60 किमी अंकप्रमाण- यामध्ये प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरुपात व्यक्त केलेले असते. उदा. 1: 60000. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात. रेषाप्रमाण- प्रमाणपट्टीच्या साह्याने नकाशावर रेषाप्रमाण दाखवले जाते. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणांमधीलप्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या साह्याने मोजता येते. नकाशा लहान मोठा करताना त्या आकारासोबत रेषाप्रमाणही बदलते

त्यामुळे हा प्रकार अधिक अचूक व विश्वासार्ह आहे. बृहतप्रमाण नकाशे जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते बृहतप्रमाण नकाशे असतात. शहर, गाव, शेत इ. नकाशे ही बृहतप्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत.
लघुप्रमाण नकाशे गणितामध्ये आपण दोन अपुर्णांकांची तुलना करतो, तेव्हा ज्या अपूर्णांकातील छेदस्थानी संख्या लहान असते त्या अपूर्णांकाचे मूल्य जास्त असते. नकाशाप्रमाण अपूर्णांकात नसून गुणोत्तरात असते. म्हणून 1:10000 या अंकप्रमाणास बृहतप्रमाण व 1:50000 या अंकप्रमाणास लघुप्रमाण नकाशे म्हणतात.
प्रश्नसूची