स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ
राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्यजनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूंनी टिळकांनी शिवजंयतीव गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी
घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आलेतर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असे त्यांचेमत होते. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’हा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग असूनलोकांनीही कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता.स्वभाषा, स्वसंस्कृतीविषयी प्रेम, आस्था बाळगणारीपिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य
चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्षकेला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते.चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एकमतहोते. पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापकजनआंदोलन उभारले पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादनकेले. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातलाआणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली.१८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकारउडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीलाआटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याचीनेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठीझडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले. लोकांवर जुलूमजबरदस्ती केली. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला. सरकारने टिळकांचा या कटाशीसंबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातअपयश आले तरीही सरकारने सूडबुद्धीने लोकमान्यटिळकांना तुरुंगात टाकले.
बंगालची फाळणी : हिंदू-मुस्लीम समाजातदुहीचे बीज पेरून ‘फोडा आणि राज्य करा’ यानीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले.
तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणीघातले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचाकारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचेकारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने १९०५ मध्येबंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळेमुस्लीम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदूबहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली.फाळणीमुळे हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता
चळवळ दुर्बल करणे हा छुपा हेतू होता.
वंगभंग चळवळ : बंगालमध्येच नव्हे तर संपूर्णभारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. १६ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिनम्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारेसरकारचा निषेध केला गेला. ‘वंदे मातरम्’ हे गीत
सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणूनरक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारीशाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्यासंख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले.वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेन्द्रनाथ बॅनर्जी,आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले.वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्तीवाढली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाचीतीव्रता पाहून १९११ साली ब्रिटिशांनी बंगालचीफाळणी रद्द केली.
राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री : १९०५ च्या राष्ट्रीयसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते.त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. १९०६च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते.व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ या
शब्दाचा सर्वप्रथम उच्चारकेला. अध्यक्षीय भाषणातत्यांनी एकजूट करा, नेटानेप्रयत्न करा आणिस्वराज्याचे ध्येय साध्यकरा म्हणजे आज जे
लक्षावधी बांधव दारिद्र्य,उपासमार व रोगराई यांनाबळी पडत आहेत त्यांनावाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रांत भारताला जेदादाभाई नौरोजी
राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणारनाही असे टिळकांचे मत होते. अधिवेशनाच्या वेळीतणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्याने अखेरीसभारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली.
ब्रिटिश सरकारची दडपशाही : वंगभंगानंतर सुरूझालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थझाले. या आंदोलनाला पायबंदघालण्यासाठीसरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिकसभांवर कायद्याने बंदी घातली. हा कायदामोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांनाहीफटके मारले. वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले.सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेकछापखाने जप्त केले. लेखकांना व संपादकांना तुरुंगातडांबले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाईकेली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली.
क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्बहल्ले करणे हे मार्गपत्करले. या बॉम्ब हल्ल्यांचे समर्थन केसरी पत्रातूनकरणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोपठेवून त्यांना सहा वर्षे म्यानमार येथील मंडालेच्यातुरुंगात पाठवले. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाचीशिक्षा ठोठावली, तर लाला लजपतराय यांनापंजाबमधून हद्दपार केले.मानाचे स्थान होते, ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेशदिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीयशिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेनेएकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपणस्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गानेजाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री,मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला
एकत्रित कराव्या लागतील आिण यातूनच आपल्यादेशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावरबहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवरबहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळेब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल
असे नेत्यांचे मत होते.नामदार गोपाळ कृष्णगोखले यांनी १९०५ मध्ये‘भारत सेवक समाजा’चीस्थापना केली.
लोकांमध्येदेशभक्ती निर्माणकरूनस्वार्थत्यागाची शिकवणदेणे. धर्म व जातीयांच्यातील विरोध नष्टकरून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचाप्रसार करणे हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते.गोपाळकृष्ण गोखले
जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद : राष्ट्रीयसभेतील विचारसरणीतील मतभेद १९०७ सालच्यासुरत अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी वबहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचाप्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांचीखटपट होती. ना.गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहामेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीयसभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असाआरोप केला. लाला लजपतराय यांनी मध्यस्थीकरण्याचा प्रयत्न केला.
मुस्लीम लीगची स्थापना : . मुस्लिमांचेहितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना
असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला. ब्रिटिशसरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लीम समाजातीलउच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगाखान यांच्यानेतृत्वाखाली गर्व्हनर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले.लॉर्डमिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने१९०६ मध्ये ‘मुस्लीम लीग’ची स्थापना झाली.
मोर्ले-मिंटो कायदा : भारतीय जनतेमध्येब्रिटिशसरकारच्या कामाबाबत असंतोष होता. भारतीयजनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचेआर्थिक धोरण होय अशी जनतेत भावना होती.कर्झनचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना
नोकऱ्यांत समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेतभारतीयांना अन्याय्य वागणूक यांमुळेही असंतोषात
भर पडली. भारतीयांच्या या असंतोषावर तात्पुरतीमलमपट्टी करण्यासाठी ‘मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा’१९०९ मध्ये करण्यात आला. या कायद्यान्वयेकायदेमंडळतील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यातआली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचासमावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यातआली. याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्तमतदारसंघाची योजना करण्यात आली. ब्रिटिशांच्या
या कुटील नीतीमुळे भारतात फुटीरवृत्तीची बीजेपेरली गेली.
लखनौ करार : भारतीय राष्ट्रीय सभेच्या १९१६च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखालीराष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला.याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीगयांच्यातही समेट घडून आला. याला ‘लखनौ करार’असे म्हणतात. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्तमतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणिभारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात
राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लीम लीगनेमान्य केले.
होमरूल चळवळ : १९१४ मध्ये टिळकांचीमंडालेच्या तुरुंगातून सुटकाझाली तेव्हा युरोपातपहिल्या महायुद्धाला तोंडफुटले होते. या युद्धाचेथेट परिणाम भारतालाहीभोगावे लागले. दैनंदिनगरजेच्या वस्तूंचे भाववाढले. ब्रिटिश सरकारनेभारतीयांवर अनेक निर्बंधलादले. यामुळे भारतीयांत असंतोष वाढू लागलाअशा परिस्थितीत डॉ.ॲनी बेझंट व लोकमान्य टिळकयांनी होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजेआपला राज्यकारभार आपण करणे यालाच स्वशासनम्हणतात. आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्धअशी चळवळ सुरू झाली होती. त्याचधर्तीवरभारतीय होमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकारब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉ.ॲनी बेझंट वलोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढूनस्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचविली. ‘स्वराज्यहा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मीमिळवणारच!’ असे टिळकांनी ठामपणे सांगितले.
पहिले महायुद्ध व भारत : युरोपातील युद्धजन्यपरिस्थिती, भारतीय जनतेतील वाढता असंतोष,होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता या
परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांनागरजेचे होते. यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ताभारतीयांना द्यायचा म्हणजे भारतीयांनाकाहीराजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारनेठरवले. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार
आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल, असे१९१७ मध्ये तत्कालीन भारतमंत्री माँटेग्यू यांनीघोषित केले. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयीसहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तरभारतीय जनतादेखील सरकारला सहकार्य करेल असेटिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला ‘प्रतियोगी सहकारिता’ असे म्हणतात.
या प्रकरणावरील टेस्ट सोडवा