"Empowering Minds, Unlocking Knowledge"

आर प्रज्ञानंद: नव्या पिढीचा बुद्धीचा योद्धा R.pradnyanand the intellectual warrior of the new generation

आर प्रज्ञानंद: नव्या पिढीचा बुद्धीचा योद्धा

0

आर प्रज्ञानंद: नव्या पिढीचा बुद्धीचा योद्धा R.pradnyanand the intellectual warrior of the new generation

#

जिंकण्याची नवी परिभाषा निर्माण करणारे आर प्रज्ञानंद आणि आर.वैशाली या भावंडांनी ओलंपियाड स्पर्धेत बुद्धिबळ या खेळामध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई करून इतिहास घडवला आहे. वैशाली रमेश बाबू आणि प्रज्ञानंद रमेश बाबू या बहिण भावाचं विशेष कौतुक विविध स्तरातून होत आहे. बुद्धिबळ हा खेळ ,तसा थोडासा दुर्लक्षितच.. परंतु भारतीयांच्या बुद्धिमत्तेला जगात तोड नाही  ही बाब विविध स्पर्धेतून आतापर्यंत सिद्ध झालेली आहे .रशिया सारख्या देशांमध्ये शालेय स्तरावर बुद्धिबळ हा खेळ शिकवला जातो. भारतात तेवढं पोषक वातावरण नाही, तरीही आर प्रज्ञानंद आणि वैशाली यांनी आकाशाला गवसणी घालण्याचं काम केलेलं आहे .त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खंबीर साथ लाभली त्या त्यांच्या आई नागलक्ष्मी यांची आणि म्हणूनच त्यांना अमेझिंग चेस मॉम असंही म्हटलं जातं.

#प्रज्ञानंद

आपल्या लेकरांसोबत विविध देशांमध्ये त्या दिसतात . विविध देशात गेल्यानंतर त्यांना घरगुती अन्न मिळावे म्हणून आपल्या सोबत स्वयंपाकाचे साहित्य सुद्धा त्यांच्या सोबतनेत असतात.आपल्या लेकरांच्या यशाबद्दल त्यांना विचारलं असता त्यांच्या डोळ्यातून समाधानाची भावना तरळते. आपल्या मुलांवर कोणतही दडपण येऊ नये यासाठी एक मानसिक साथ त्या नेहमीच देत असतात.सोशल मीडियावर आर प्रज्ञानंद यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये खेळायला अवघे पाच मिनिट शिल्लक असताना पत्रकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना गराडा घातला तरी सुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तो थांबला.एवढ्या व्यस्त दिनचर्येतून आपल्या चाहत्यांना वेळ देणे या कृतीमुळे अनेकांची हृदय त्यांनी जिंकली. हंगेरी येथे बुडापेस्ट या ठिकाणी झालेल्या ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेमध्ये या भारताच्या दोन तरुणांनी विशेष म्हणजे बहीण भावांनी ही दोन्ही सुवर्णपदक जिंकली.

बुद्धिबळ हा खेळ भारतात उगम पावला सर्व जगात पोहोचला. बुद्धिबळात शांतता संयम आणि टप्प्याटप्प्याने यश मिळवणे महत्त्वाचे असते. बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूला विजयापर्यंत जाण्यासाठी विविध चालींची रचना करावी लागते, प्रचंड संयम बाळगावा लागतो. खरंतर बुद्धिबळ जीवनात कसं वागायचं ?हे सुद्धा शिकवून जाणारा एक खेळ आहे. कितीही वर्ष झाली तरी त्याबद्दलचे प्रेम आजही जगभरातून ओसंडून वाहते आहे. ६४ घरांच्या या खेळामध्ये किती प्रकारच्या चाली आहेत हे अजून संगणक सुद्धा सांगू शकला नाही. विश्वनाथन आनंद भारताचा बुद्धिबळातील एक दिग्गज खेळाडू. त्यांच्या प्रेरणेने आज कितीतरी खेळाडू या क्षेत्रात उतरलेले आहेत.

आपल्या बहिणीला चेस खेळताना पाहून खेळाची आवड निर्माण झालेल्या आर प्रज्ञानंद यांनी हळूहळू आपल्या बहिणीला वरचढ असा खेळ करायला सुरुवात केली.१९ वर्षीय प्रज्ञानंदने एक इतिहास असाच घडवला होता ,जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला चेकमेट केले . बुद्धिबळाची जाणीव असलेल्या सर्वांनाच माहित आहे की मॅग्नस कार्लसनला पराभूत करणे किती अवघड काम आहे.२३वर्षीय वैशालीनेही आपल्या खेळातून आपल्या कौशल्याची चुणूक साऱ्या जगाला दाखवली. या दोन्ही भावांनी ग्रँडमास्टर हा किताब पटकावलेला आहे. बुद्धिबळ विश्वात खरंतर या दोघा बहीण भावंडांच्या यशापेक्षा चर्चा आहे ती त्यांच्या आईची. अमेझिंग चेस मॉम म्हणून त्यांना ओळखलं जाते.नागलक्ष्मी या गृहिणी आहेत पण आपल्या मुलांच्या आवडीला त्यांनी सतत बळ देण्याचं काम केलं .खरंतर बुद्धिबळ क्षेत्रामध्ये करिअर करायला कोणतेही कुटुंब सहसा धजावत नाही .कुठेतरी नोकरी मिळून स्थिरस्थावर होऊन आपला प्रपंच चालवावा याच विचारांमध्ये बहुतांश कुटुंब असतात. परंतु बुद्धिबळ या अतिशय कठीण अशा क्षेत्रांमध्ये आपल्या करिअरच्या वाटा निर्माण करून संपूर्ण जगाला स्तंभित करण्याचे काम या दोन्ही बहिण भावांनी केलेले आहे.

 

आर प्रज्ञानंद व आर वैशाली यांचे यश

सर्जिकर जाकीण नंतर लहान वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा मान प्रज्ञानंद रमेश बाबू यांनी पटकावलेला आहे.प्रज्ञानंदने २०१३ मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप अंडर ८ चे विजेतेपद जिंकले .वयाच्या सातव्या वर्षी त्याला फिडे मास्टर चे विजेतेपद मिळाले.त्याने २०१५ मध्ये दहा वर्षाखालील विजेते पद जिंकले.२०१६ मध्ये प्रज्ञानंद दहा वर्षे दहा महिन्यांनी  आणि १९ दिवसाच्या वयामध्ये इतिहासातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. विविध स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवत प्रज्ञानंद याने जागतिक कीर्ती मिळवली आहे.

वैशाली रमेश बाबू यांचा जन्म २००१ ला तामिळनाडू या राज्यात चेन्नई या ठिकाणी झाला. त्यांनी अंडर १२ अंडर १४ विश्व युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे.मॅग्नस कार्लसनला हरविण्याचा पराक्रम त्यांनी बाराव्या वर्षीच केलेला आहे. त्यांना २०२४ चा अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

प्रज्ञानंद

आर प्रज्ञानंद व आर वैशाली यांचे वडील रमेश बाबू हे टी.एन. एस.सी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात आणि त्यांच्या आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत या दोन्हीही ग्रँडमास्टरला घडविणाऱ्या या कुटुंबाला सलाम…..

साधे राहणीमान असलेल्या अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले प्रज्ञानंद आणि वैशाली हे आजच्या युवा पिढीचे आदर्श बनावेत एवढीच प्रांजळ अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More