युनिफाईड पेन्शन बाबत महत्त्वाचे मुद्दे
केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रराज्याने सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे.
या योजनेला युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस असे नाव देण्यात आले आहे.
ही योजना एक एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
या योजनेअंतर्गत दहा वर्षे सेवा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी किमान 25 वर्ष काम केले असेल तर निवृत्ती पूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.
शनिवार 24 ऑगस्ट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेची घोषणा केली.
यासाठी डॉक्टर सोमनाथ समितीची स्थापना करण्यात आली होती.
नवीन योजना एक एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल.
पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन रकमेच्या 60 टक्के रक्कम मिळेल.