"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS GEOGRAPHY CHAPTER 5 MOCK TEST विषय भूगोल प्रकरण पाच सागरी प्रवाह

विषय भूगोल प्रकरण पाच सागरी प्रवाह

0

NMMS GEOGRAPHY CHAPTER 5 MOCK TEST विषय भूगोल प्रकरण पाच सागरी प्रवाह

सागरी प्रवाहमुळे प्रवाहाच्या सानिध्यात असलेल्या प्रदेशावर सागरी प्रवाहाचा परिणाम होतो.

पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील दहा टक्के पाणी वाहते.

सागर पृष्ठापासून पाचशे मीटर पर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठिय प्रवाह म्हणून मानले जातात.

पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणाली सारखी आहे तथापि हिंदी महासागरातील प्रवाह चक्र वेगळे आहे.

पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहाच्या दिशा बदलतात.

सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो.

उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते असे धुके वाहतुकीस अडथळा आणणारे ठरते.

न्यू फाउंड्लंड बेटाजवळ गल्फ उष्णप्रवाह आणि लेब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिसळतात त्यामुळे दाट धुके निर्माण होते.

500 मीटर पेक्षा खोलीवरील पाण्यामध्ये प्रवाह असतात त्यांचा खोल पाण्यातील प्रवाह म्हणून उल्लेख होतो.

खोलवर वाहणारे प्रवाह हे पाण्याचे तापमान व घटनेतील फरक यामुळे तयार होतात.

उष्णता व क्षारता यामुळे झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते.

पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून खालील चाचणी सोडवा

 

Results

अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे…

काही हरकत नाही गुण कमी मिळाल्यास आणखी टेस्ट सोडवा आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धातील सागरी प्रवाह कसे फिरतात ?

#2. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे ?

#3. खालीलपैकी कोणता शीत प्रवाह आहे ?

#4. सागरी प्रवाहाचा वेग साधारणतः ताशी किती असतो ?

#5. खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे ?

#6. शीत सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कसे असते ?

#7. खालीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे ?

#8. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते?

#9. उष्ण सागरी प्रवाह कसे वाहतात ?

#10. पृष्ठीय प्रवाह म्हणजे काय ?

#11. जर पृथ्वीपूर्वेकडून पश्चिमेकडे फिरू लागली तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील समुद्र प्रवाहांची दिशा कोणती असेल ?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More