NMMS GEOGRAPHY CHAPTER 7 POPULATION
NMMS भूगोल प्रकरण सात लोकसंख्या
लोकसंख्या
NMMS EXAM कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी चार घटक उपयुक्त ठरतात.
1. लोकसंख्या वाढ
2. लोकसंख्या वितरण
3. लोकसंख्येची घनता
4. लोकसंख्येची रचना
1. लोकसंख्या वाढ
लोकसंख्या घटकाचा विचार केल्यास ती सतत वाढत वा घटत असते. ही वाढ किंवा घट जन्मदर, मृत्युदर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इ. बाबींशी निगडीत असते.
जन्मदर – एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर होय.
मृत्युदर – एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्युदर होय.
आयुर्मान – एखाद्या प्रदेशातील व्यक्तींच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे आयुर्मान होय.
स्थलांतर – व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. एखाद्या प्रदेशात बाहेरुन व्यक्ती वास्तव्यासाठी येणे म्हणजे अंतःस्थलांतर होय, तर त्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिःस्थलांतर होय.
लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीवर व घटीवर जन्मदर व मृत्युदर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडत असतो.
स्थलांतर व लोकसंख्येच्या वाढीचा संसाधनांवर अमर्याद ताण पडत असतो.
2. लोकसंख्या वितरण
* प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशांत कशा रितीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरुन समजते.
* मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. याशिवाय मैदानी प्रदेश, डोंगर, पर्वत, उंचसखलपणा याचा लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो..
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक
↓ प्राकृतिक घटक
↓ आर्थिक घटक
↓ राजकीय घटक
देशातील लोकसंख्या क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता होय.
गोव्याची लोकसंख्या ही त्याच्या क्षेत्रफळाच्या मानाने जास्त असल्याने घनता अधिक तर राजस्थानसारख्या राज्याचे क्षेत्रफळ अधिक असून लोकसंख्या कमी असल्याने त्याची घनता ही कमी राहील.
लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकांत वर्गवारी करून लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजून येते. लिंग, वय, ग्रामीण, नागरी, साक्षरता, कार्यक्षमता इ मुद्यांच्या आधारे हे वर्गीकरण केले जाते. पुढील अनेक मुद्यांच्या आधारे देखील लोकसंख्या वर्गीकरण केले जाते.
1. पुरुष 2. कुमार 3. निरक्षर 4. बालक 5. बेरोजगार 6 शिशु 7. साक्षर 8. ग्रामीण 9. कार्यरत गट 10. नागरी 11. स्त्री 12. वृध्द 13. युवक 14. अवलंबित गट 15. प्रौढ
लिंग गुणोत्तर –
लिंग गुणोत्तर प्रमाण = स्त्रियांची एकूण संख्या पुरुषांची एकूण संख्या /पुरुषांची एकूण संख्या *1000
दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात, तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात.
एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जाते, तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे म्हणतात. याचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतीमानता समजण्यासाठी होतो. भारतात
कार्यक्षम लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 या वयांतील व्यक्तींचा गट होय. हा गट अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष सहभागी असतो. हा गट जेवढा अधिक तेवढा त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो.
ज्यांना लिहीता वाचता येत असेल त्या व्यक्ती साक्षर समजल्या जातात. वय वर्षे 7 पेक्षा अधिक लोकसंख्येचे विभाजन साक्षर व निरक्षर लोकसंख्येत केले जाते. साक्षरतेचे प्रमाण जेवढे अधिक तेवढी सामाजिक व आर्थिक प्रगती त्या प्रदेशाची अधिक होते.
स्थलांतर –
* एखाद्या समूहाने वा व्यक्तीने एका ठिकाणाहुन इतरत्र कायम वा अस्थायी निवासासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय, उदा. विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युध्द इ कारणांनी लोक स्थलांतर करत असतात,
केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नाही. हा विचार सर्वमान्य झाला असून तो व्यक्तीत्सापेक्ष व प्रदेश किंवा राष्ट्रतापेकही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला आहे.
निर्देशांक ठरविताना तीन निकष विचारात घेतले जातात.
1. आर्थिक निकष म्हणजेच सरासरी राहणीमान
2. आरोग्य म्हणजेच अपेक्षित आयुर्मान
3. शिक्षण म्हणजेच शैक्षणिक कालावधी
मानवी विकासाची मूल्य 0 ते 1 या दरम्यान दाखवले जाते. अति विकसित देशाचा निर्देशांक हा 1 च्या जवळ असतो तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी असेल तसतसा हा निर्देशांक कमी कमी होत जातो. एखाद्या प्रदेशाचा विकास अगदीच कमी असला तर हा निर्देशांक 0 च्या जवळ असतो.
वरील नोट्सचा अभ्यास केल्यानंतर खाली दिलेल्या चाचणीला सोडवा आपली प्रगती तपासून पहा.
Results
अभिनंदन आपली प्रगती छान आहे
काही हरकत नाही गुण कमी मिळाल्यास चाचणी पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा