"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS CIVICS CHAPTER 5 PART 1 एन एम एम एस नागरिकशास्त्र प्रकरण पाच भाग एक

0

NMMS CIVICS CHAPTER 5 PART 1

एन एम एम एस नागरिकशास्त्र प्रकरण पाच भाग एक

NMMS

 संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासनसंस्था कार्यरत असतात.
राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रदे पातळीवर राज्यशासन कार्य करते.
भारतात 28 घटकराज्ये असून त्यांचा कारभार तेथील राज्यशासन करते.
भारताचा भौगोलिक विस्तार, लोकसंख्येचे बहुजिनसी स्वरुप, भाषा, धर्म, चालीरिती व प्रादेशिक स्वरूप यावाक •
भारताचा भौगोलिका विस्तार संपेराज्य व्यवस्था स्वीकारली. घटकराज्याची निर्मिती भाषेच्या आधारावर केली त्यानुसार भाषावार प्रांतरचना झाली.
जम्मू आणि काश्मीर वगळता भारतातील सर्वच घटकराज्यांच्या शासनयंत्रणा स्वरूप राजकीयदृष्ट्या सारखेच आहे.
NMMS CIVICS
 भारतात 28 घटकराज्ये असली तरी विधानसभांची संख्या 31 आहे. कारण दिल्ली, पुटुबेरी आणि जम्मू-काश्मीर क केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा अस्तित्त्वात आहेत.
 राज्यशासनाचे विधिमंडळ
केंद्रिय पातळीवर संसद व राज्यशासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे.
केवळ सातच राज्यांतील विधिमंडळ दोन सभागृहांचे आहे.
त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात.
महाराष्ट्रचे विधिमंडळ :– महाराष्ट्रत विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन्ही सभागृहे आहेत.
विधानसभा
1) महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले सभागृह असून सभासद संख्या 288 आहे.
2) अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्त्व नसल्यास राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात्
3) अनुसूचित जाती व जमातीच्या काही जागा राखीव असतात.
4) विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते.
5) वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते.
 नव्याने अस्तित्त्वात आलेले विधानसभेचे सदस्य त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते.
 महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात. अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते, तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते.
विधानपरिषद
1) महाराष्ट्र विधिमंडळाचे दुसरे सभागृह असून सदस्य संख्या 78 आहे
2) कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची निवड राज्यपाल करतात.
3) उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासनसंस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ यांतून निवडले
जातात.
विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. यातील ठरावीक सदस्य संख्या दर दोन वर्षांनी निवृत्त होऊन तेवढ्याच जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात.
महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ
महाराष्ट्रच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश आहे.
 घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत होते. राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत.
मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. मुख्यमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात.
मुख्यमंत्र्याची कार्ये :-
१) बहुमत सिद्ध झाल्यानंतर प्रथम मंत्रिमंडळ तयार करणे,
२) मंत्रिमंडळ तयार केल्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप करणे.
3) खात्या-खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय साधत जनकल्याणाच्या दृष्टीने कार्यरत राहणे.
४) राज्याचे नेतृत्त्व करणे,
संघराज्य व्यवस्था
राष्ट्रीय पातळी
संघशासन
लोकसभा
राज्यसभा
राज्य पातळी
राज्यशासन
28 घटकराज्ये
विधानसभा
विधान परिषदा
महाराष्ट्र

 

विधानसभा
288 सभासद संख्या
काही जागा राखीव (अनु.जाती, अनु. जमाती.)
5 वर्षाचा कार्यकाळ (सदस्य) 
पुर्णपणे बरखास्त होते.
विधान परिषद
78 सभासद संख्या
कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, समाजसेवा या क्षेत्रातील तज राज्यपाल निवडतात
6 वर्षाचा कार्यकाळ (सदस्य)
पूर्णतः बरखास्त होत नाही.
 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. संघराज्य व्यवस्थेत शासन किती पातळ्यांवर कार्यरत असते ?

#2. घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर झालेली आहे ?

#3. विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात ?

#4. घटक राज्यांचा कारभार पाहणारे शासन कोणते ?

#5. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे शासन म्हणजे काय ?

#6. भारतातील कोणत्या घटक राज्यांच्या शासन नियंत्रणेचे स्वरूप अन्य राज्यांपेक्षा वेगळे आहे ?

#7. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत ?

#8. केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्यांचे …………….. आहे ?

#9. भारतातील एकूण विधानसभांची संख्या किती ?

#10. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पहिल्या सभागृहाची सदस्य संख्या किती ?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More