NMMS GEOGRAPHY CHAPTER 5 MOCK TEST विषय भूगोल प्रकरण पाच सागरी प्रवाह
सागरी प्रवाहमुळे प्रवाहाच्या सानिध्यात असलेल्या प्रदेशावर सागरी प्रवाहाचा परिणाम होतो.
पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील दहा टक्के पाणी वाहते.
सागर पृष्ठापासून पाचशे मीटर पर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठिय प्रवाह म्हणून मानले जातात.
पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणाली सारखी आहे तथापि हिंदी महासागरातील प्रवाह चक्र वेगळे आहे.
पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहाच्या दिशा बदलतात.
सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो.
उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते असे धुके वाहतुकीस अडथळा आणणारे ठरते.
न्यू फाउंड्लंड बेटाजवळ गल्फ उष्णप्रवाह आणि लेब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिसळतात त्यामुळे दाट धुके निर्माण होते.
500 मीटर पेक्षा खोलीवरील पाण्यामध्ये प्रवाह असतात त्यांचा खोल पाण्यातील प्रवाह म्हणून उल्लेख होतो.
खोलवर वाहणारे प्रवाह हे पाण्याचे तापमान व घटनेतील फरक यामुळे तयार होतात.
उष्णता व क्षारता यामुळे झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते.
पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून खालील चाचणी सोडवा
Results
अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे…
काही हरकत नाही गुण कमी मिळाल्यास आणखी टेस्ट सोडवा आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न करा