NMMS GEOGRAPHY CHAPTER 6 NOTES AND MOCK TEST

NMMS भूगोल प्रकरण सहा भूमी उपयोजन
भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा म्हणजेच जमिनीचा केलेला वापर होय.
भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण झालेली संकल्पना आहे.
प्रत्यक्ष शेती खाली असलेले क्षेत्र हे वैयक्तिक मालकीचे असते
शेतजमीन पण जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ते पडीक जमीन क्षेत्र असते
गायरान किंवा माळरान ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते
नकाशावर उपयोजन क्षेत्रीय दाखवीताना विशेष रंगाचा वापर केला जातो जसे की लाल म्हणजे निवासी क्षेत्र निळा म्हणजे व्यावसायिक क्षेत्र पिवळा म्हणजे कृषी क्षेत्र आणि हिरवा म्हणजे वनक्षेत्र मिश्र वापर क्षेत्रामध्ये दोन किंवा अधिक क्षेत्रे एकत्रितरित्या वापरली जातात
सातबाराच्या उताऱ्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क करतो सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा आहे
गाव नमुना 7 व गाव नमुना 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो
भोगवटदार एक म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते
ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक खालील प्रमाणे आहेत
हवामान मृदा उताराचे स्वरूप जलसिंचन सुविधा नैसर्गिक साधन संपत्ती सरकारी धोरण आणि
नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक भूक्षेत्राचे स्थान नैसर्गिक साधन संपत्ती गृहनिर्माण धोरण वाहतूक मार्ग औद्योगीकरण व्यापार क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण
वरील नोट्सचा अभ्यास केल्यानंतर खालील चाचणी सोडवा.
Results
अभिनंदन आपली प्रगती छान आहे
गुण कमी मिळाल्यास चाचणी पुन्हा सोडवा आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.