NMMS HISTORY CHAPTER 13
NMMS स्वातंत्र्य लढ्याची परिपुर्ती
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात 600 च्या वर संस्थाने होती.
या संस्थानांच्या विलीनीकरणासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रयत्न केले.
असहकार आंदोलनाच्या जागृतीमुळे संस्थानांमध्ये राजकिय जागृतीला सुरूवात झाली.
असहकार आंदोलन माल प्रजेच्या हितासाठी व ज्यांना राजकिय अधिकार मिळावे म्हणून काम करतात जनसंघटना होत.
1927 मध्ये प्रजामंडळांची मिळून अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली.
– भारतात सामिल होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे संस्थानिकांना पटवून देण्याचे काम सरदार पटेलांनी बेड जुनागड, हैदराबाद, काश्मिर ही संस्थाने वगळता सर्व संस्थाने भारतात सामिल झाली.
जुनागड सौराष्ट्रातील संस्थान होते.
जुनागडचा नवाब पाकीस्तानात सामिल होऊ इच्छित होता.
NMMS EXAM हैदराबाद मुक्ती संग्राम –
हैदराबाद भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.
1948 च्या फेब्रुवारीत जुनागड भारतात विलिन झाले.
त्यामध्ये तेलुगु, कन्नड, मराठी भाषिक प्रांत होते.
• आपले हक्क मिळविण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगणा भागात आंध्र परिषद, मराठवाडा भागात महलम्
परिषद, कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या.
1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली.
हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळविण्याच्या लढ्यामध्ये स्वामिजींनी नारायणा रेड्डी आणि सिराझ उल हसन यांची साथ लाभली.
पी.व्ही. नरसिंहराव आणि गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते.
निजामाचा सहकारी कासीम रिझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलिन होण्याची मागणी धुडकावून लावण्यात्सार्व
रझाकार संघटना स्थापन केली.
13 सप्टेंबर 1948 ला भारताने निजामाविरुध्द पोलिस कारवाई सुरू केली. त्याला ‘ऑपरेशन पोलो’ हे सांकेतिक नाव होते.
17 सप्टेंबर 1948 ला निजाम शरण आला. –
हैदराबाद मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई
वाघमारे, माणिकचंद पहाडे यांचे मौलिक योगदान होते.
वंदे मातरम् चळवळीव्दारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले.
हैदराबाद मुक्ती संग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोष
उल्ला खान इ. लोक शहीद झाले.
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पुदुचेरी, कारिकल, माहे व याणम या प्रदेशांवर फ्रान्सचे अधिपत्य होते.

गोवा मुक्ती लढा –
पोर्तुगालच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्याचा लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा आघाडीवर होते. पोर्तुगिजांच्या विरूध्द लढा उभारण्याच्या उद्देशाने त्यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली.
1945 मध्ये डॉ. कुन्हा यांनी गोवा युथ लिग ही संघटना मुंबईत स्थापन केली.
– गुजरातमधील दादरा आणि नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची उभारणी करण्यात आली. 2 ऑगस्ट 1954 रोजी आझाद गोमंतक दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगिज सत्तेपासून मुक्त केला.
– दादरा नगर हवेलीच्या सशस्त्र हल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर यांनी सहभाग घेतला.
1954 मध्ये गोवामुक्ती समिती स्थापन करण्यात आली.
– गोवा मुक्ती समितीत ना.ग. गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेवशास्त्री जोशी, सुधाताई जोशी हे सहभागी
होते. मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते.
19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला.
वरील नोट्स वाचून खालील टेस्ट सोडवा
Results
अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट सोडवत रहा
नोट्स पुन्हा वाचा. टेस्ट पुन्हा सोडवा. आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.
#1. गोवा काँग्रेस समितीची स्थापना कशासाठी करण्यात आली होती ?
#2. जुनागड विलीनीकरणाबाबत चुकीचे विधान ओळखा .
#3. कोणता दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो?
#4. 1945 साली मुंबईमध्ये गोवा युथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली?
#5. भारत सरकारने हैदराबादच्या निजामाच्या विरोधात केलेल्या पोलीस कारवाईला कोणते सांकेतिक नाव दिले गेले ?
#6. भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते?
#7. हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना कोणी केली ?
#8. रझाकार नावाची संघटना कोणी स्थापन केली ?
#9. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भारतात सामील होण्याच्या आवाहनाला कोणत्या संस्थानिकांनी विरोध केला नाही ?
#10. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित नसलेले नाव ओळखा .
इतिहास प्रकरण 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती यावरील नोट्स वाचण्यासाठी व टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा .