NMMS History chapter 8 mock test
महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे मिठावरील कर रद्द करण्याची मागणी केली पण सरकारने मागणी मान्य केली नाही .गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरवले .मिठाचा सत्याग्रह प्रतीकात्मक होता. या सत्याग्रहासाठी गांधीजींनी दांडी या ठिकाणाची निवड केली.
खान अब्दुल गफारखान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी खुदाई खीदमतगार या संघटनेची स्थापना केली. सविनय कायदेभंग चळवळीत सोलापुरातील गिरणी कामगार आघाडीवर होते .त्यांच्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात अनेक स्वयंसेवक मृत्यू मुखी पडले .परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन इत्यादींवर हल्ले केले. या आंदोलनात आघाडीवर असलेले मलप्पा धनशेट्टी ,श्रीकृष्ण सारडा ,कुर्बान हुसेन ,जगन्नाथ शिंदे यांना फासावर चढवण्यात आले .
सरोजिनी नायडू यांनी गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले. परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. ट्रक त्यांच्या अंगावरून नेल्या गेला. त्यात बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झाले .
सविनय कायदेभंग सुरू असतानाच 1930 ते 1932 या कालावधीत लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले. पुणे करार गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर पण केले त्याविरुद्ध गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.
1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या मध्ये करार झाला हा करार पुणेकरार म्हणून ओळखला जातो .या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली.
या प्रकरणावर आधारित चाचणी सोडवा
चाचणी
Results
अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे. अशीच तयारी ठेवा.
काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.
#1. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांबाबत प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले?
#2. कितव्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते?
#3. गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
#4. गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी कशाची मागणी केली?
#5. कायदेभंगांच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे खाली दिलेली आहेत त्यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते.
#6. बाबू गेनू चे बलिदान खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
#7. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोठे पदयात्रा काढली?
#8. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली?
#9. खालीलपैकी कोणती घटना अगोदर घडली?
#10. चुकीचा घटक ओळखा.मिठाचा सत्याग्रह झालेली महाराष्ट्रातील ठिकाणे. वडाळा, रत्नागिरी, मालवण, शिरोडा