NMMS NOTES History chapter 14
NMMS NOTES महाराष्ट्र राज्याची निर्मिती नोट्स
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इ.स. 1946 पासून सुरू झाली. 1915 मध्ये टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती.
12 में 1649 ला बेळगांव येथे आयोजित साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्य
आला. 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकिकरण परिषद भरली होती. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषाक प्रांतरचनेसाठी दार कमिशन ची स्थापना केली.
10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाला.
भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटे पट्टाभिसितारामय्या या नेत्यांची समिती बनविण्यात आली. या तिघांच्या नावाच्या आद्याक्षरावरून ही समिती जे. व्ही.पी. या नाम ओळखली जाते.
जे. व्ही.पी. समितीच्या अहवालासंदर्भात विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यावेळी जनजागृतीस सेनापती बापट यांनी प्रभातफेऱ्या काढल्या.
आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता.
भारत सरकारने न्यायमुर्ती एस. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापना केली.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालात मुंबईचे विद्वभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस करण्यात आली. सर्व मराठी भाषिक जनतेने एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला.
मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा या संदर्भात मुंबईत कामगार मैदानावर झालेल्या सभेत सुमतीबाई इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहरी इ. महिलांनी सहभाग घे 7 नोव्हेंबर 1955 रोजी झालेल्या कामगारांच्या सभेत कम्युनिष्ट प्रजा, समाजवादी शेतकरी कामगार पक्ष, जनस राजकिय पक्ष सामिल झाले होते.
7 नोव्हेंबर 1955 साली झालेल्या कामगार सभेचे अध्यक्षपद कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी भूषविले. या अधिवे एस.एम. जोशी यांनी मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा ठराव मांडला. मोरारजी देसाई मुख्यमंत्री असतांना सेनापती यांच्या नेतृत्वात विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला होता.
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना –
6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. संयुक्तम समितीची कार्यकारीणी बनविताना अध्यक्षपदी कॉ. श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉ. त्र्यं. रा. नरवणे तर सचिवपदी एस.एम यांची निवड झाली. ही समिती स्थापन करण्यात ग.त्र्यं. मांडगोलकर, आचार्य प्र. के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव व.कृ. सोवणी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
सेनापती बापट, क्रांतिसिह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या जनआंदोलनावर झालेल्या गोळीबारात 106 कार्यकर्ते हुतात्मा झाले. 106 सुपूत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले आहे.
1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषीक मुंबई राज्य अस्तित्वात आले. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पं. नेहरूंच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 ला होणार होते, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला होता. भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, जयंतराव टिळक, प्र. के. अत्रे, उध्दवराव पाटील हे नेते सहभागी होते. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला, त्याकायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रातून जनजागृती केली. बाळासाहेब ठाकरेंनी ‘मावळा’ या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनविले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख, शाहिर द.ना. गवाणकर यांनी आपल्या शायरीतून जनजागृती केली.
वरील प्रकरणाची टेस्ट सोडवा
Results
अभिनंदन आपली प्रगती छान आहे टेस्ट सोडवत रहा
नोट्स पुन्हा वाचा चाचणी पुन्हा सोडवा आपली प्रगती वाढविण्यासाठी प्रयत्नरत रहा